प्रकाशन का नाम: 20ची टोळी – एक चित्रकथा
रचनाकार: ऑरिजित सेन, समर्थ, सोनल रघुवंशी
मराठी अनुवाद: अनिल आठलेकर
प्रकाशन: ऑक्टोबर 2022
उपलब्ध भाषा: अंग्रेजी, हिंदी, मराठी, बंगाली
उपलब्ध स्वरूप: प्रिंट, Epub, PDF
*हेन्रिच बॉल फाउंडेशन (प्रादेशिक कार्यालय नवी दिल्ली) यांच्या सहकार्याने सेंटर फॉर फायनान्शियल अकाउंटेबिलिटी (CFA) ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे
कॉमिक बुक बद्दल-
चहा-पाणी तलावाच्या काठी एक प्रचंड आवार तयार झाले आहे. सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सुविधांनी सजलेले, जी20 (20ची टोळी ) वार्षिक बैठकीसाठी प्रदर्शित होणारी भव्यता आणि दिव्यता पाहण्यासाठी जगातील नेते आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार जमा झाले आहेत. 20 च्या टोळीने दाखवलेल्या कल्पनाशक्ती, वचनबद्धता आणि कृतीच्या अभावाबद्दल निषेध नोंदवण्यासाठी सर्वसामान्य प्राणी देशाच्या कानाकोप-यातून प्रवास करत येतील, या अपेक्षेने कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण आहे. जनता नवीन वास्तवाला सामोरे जात आहे. “इन्कलाब झिंदाबाद” च्या घोषणांनी स्थळाच्या बाहेरचा परिसर दुमदुमत आहे आणि सर्वोच्च नेत्याला देशविरोधी कारवायांच्या धोक्याची माहिती देण्यात आली आहे. धडक कारवाई सुरू झाली आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे – शेतकरी, कामगार वर्ग, विद्यार्थी, निर्वासित आणि उपेक्षित लोक एकत्र आले आहेत! आणि सज्ज झाले आहेत एका वेळी एक लढाई करण्यासाठी !
प्रिंट कॉपी मिळविण्यासाठी –
आम्हाला info@cenfa.org वर ईमेल लिहा
ऑनलाइन कॉपी –
पुस्तकाबद्दल लोक काय म्हणत आहेत?
“नफा, शक्ती आणि वैयक्तिक फायदा त्यांच्या बँकेच्या तपशिलांचे तेजस्वी, डिजिटल दिवे, कमी होणारा पैसा, मोजक्या लोकांसाठी अनेकांकडून हस्तगत केलेली मौल्यवान सामाजिक संपत्ती याशिवाय दुसरे काहीही पाहू शकत नाही. हे समयोचित कॉमिक जागतिक नेतृत्वाच्या निस्तेजपणाची झलक देते. हे आम्हाला सांगते की आम्हाला काहीतरी चांगले हवे आहे. ऑक्सिजन, कदाचित, वातानुकूलित शून्यतेच्या शिळ्या हवेपेक्षा अजून काहीतरी चांगले!”
– विजय प्रसाद
“हे कॉमिक सामर्थ्याचा दिखावा आणि प्रतिकाराची अपरिहार्यता यावर प्रभावीपणे भाष्य करते. उत्कृष्ट उपहासाचे हे एक उदाहरणच आहे.”
– नीरा चांडोके
निर्मात्यांबद्दल-
ओरिजित सेन: हे एक ग्राफिक कलाकार असून म्युरॅलिस्ट, व्यंगचित्रकार आणि भारतात, गोवा येथे स्थित डिझायनर आहेत. ते ‘पीपल ट्री’चे सह-संस्थापक आहेत, जो कलाकार, डिझाइनर आणि कारागीर यांच्यासाठी एक सहयोगी स्टुडिओ आहे. ओरिजित हे रिव्हर ऑफ स्टोरीजचे (1994) लेखक आहेत, जी भारतातील पहिली ग्राफिक कादंबरी मानली जाते. 2021 मध्ये, ओरिजित यांनी एकतारा ट्रस्टच्या सहकार्याने ‘कॉमिक्सेन्स’ लाँच केले – जे तरुण वाचकांसाठी असणारे एक कॉमिक्सचे त्रैमासिक आहे आणि ओरिजित त्याचे मुख्य संपादक आहेत. ते कॉमिक्स आणि ग्राफिक आर्टसदेखील शिकवतात आणि गोवा विद्यापीठात ‘मारियो मिरांडा चेअर व्हिजिटिंग प्रोफेसर’ आहेत त्याचबरोबर अशोक विद्यापीठाच्या व्हिज्युअल आर्ट्सच विभागाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत.
सोनल रघुवंशी: सोनल रघुवंशी या पुस्तकाच्या संपादक आणि समन्वयक आहेत. त्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासक आहेत आणि सध्या सेंटर फॉर फायनान्शिअल अकाऊंटॅबिलिटीशी संबंधित आहेत. त्यांचे संशोधन विकासात अर्थव्यवस्थेच्या असणार्या भूमिकेकडे (विशेषत: आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांशी संलग्न) आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमधील स्थूल आर्थिक धोरण याकडे लक्ष ठेवते याशिवाय त्या अर्थशास्त्र विभागामध्ये गांभीर्याने काम करतात. त्या एका शैक्षणिक जर्नलच्या सहसंपादकदेखील आहेत आणि विविध पुरोगामी विद्यार्थी गट आणि चळवळी यांच्या एक आयोजकही आहेत.
समर्थ: समर्थ हे ग्राफीक कादंबरीकार आणि संशोधक आहेत. त्याचा पहिली ग्राफिक कादंबरी ‘सूट’ ही योडा प्रेसने जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित केली. सामाजिक-राजकीय संबंधांचा अभ्यास आणि विवेचन करण्यासाठी त्यांचे कार्य हेच त्यांच्यासाठी एक साधन बनले आहे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अनुभव तयार करण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून ते सामाजिक आणि विकास क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचे बहुतेक स्वतंत्र काम कामाच्या तासांच्या वेळेपूर्वी आणि नंतर घडते. इन्स्टाग्रामवर त्यांचे ‘रोकिन‘ या नावाने हँडल आहे, तिथे तुम्ही त्यांचे कार्य पाहू शकता.
Read this in English here.
Read this in Hindi here.